काही दिवसांपूर्वी ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनीलौंड्रीग प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयाने मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ७ मार्चपर्यंत एडीची कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंभोज यांनी कोविडा नियमांचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी तलवार काढून जल्लोष केला होता.(bjp mohit kambhoj tweet on arrest)
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहित कंभोज(Mohit Kambhoj) यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. आता या प्रकरणात मोहित कंभोज यांना मुंबई पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे. भाजप नेते मोहित कंभोज यांनी स्वतः या संदर्भात ट्विट केलं आहे. सध्या मोहित कंभोज यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे
भाजप नेते मोहित कंभोज यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मला अटक होणार आहे असं दिसतंय! जय भवानी जय शिवाजी.” मोहित कंभोज यांनी यासंदर्भात आणखी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “गुन्हा निश्चित नसतो. मात्र गुन्हेगार निश्चित असतो.” त्यामुळे मोहित कंभोज यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लगता हैं मुझे Arrest करने की तैयारी चालू हैं !
जय भवानी जय शिवाजी !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) March 5, 2022
याआधी भाजप नेते मोहित कंभोज यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मोहित कंभोज यांनी काल पुन्हा पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्र्यांवर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेत आर्यन खान केसची थांबलेली चौकशी मुंबई पोलिसांनी पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली आहे.
गुनाह तय नहीं , लेकिन गुनाहगार तय हो गए।
आघाड़ी सरकार की अंधेरगर्दी !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) March 5, 2022
या पत्रकार परिषदेत भाजप नेते मोहित कंभोज म्हणाले की, “मुंबई पोलिस आयुक्तांकडून आर्यन खान केसची थांबलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे. क्रूझ केसही संबंधित एनसीबीचे अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीसाठी जी एसआयटी बनवली होती. ही एसआयटी आता बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.”
“आता या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची गरज असल्याचं नव्या पोलीस आयुक्तांनी म्हंटल आहे, या गोष्टीचे मी स्वागत करतो”, असे भाजप नेते मोहित कंभोज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या ट्विटच्या माध्यमातून भाजप नेते मोहित कंभोज यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
विदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी भारतात होतात नापास, मोठी माहिती आली समोर
करोडोंची संपत्ती असतानाही आपल्या मुलाला मोजून पैसै देतो अक्षय कुमार, कारण वाचून कौतुक वाटेल
जेव्हा शेन वॉर्नने शिल्पा शेट्टीला शिकवला होता ‘हा’ खेळ, त्यानंतर IPL मध्ये वॉर्नने घातला होता धुमाकूळ