नरेंद्र मोदींंच्या वाराणसी मतदार संघात भाजपला मोठा धक्का! पदवीधर निवडणूकीत मोठा पराभव

वाराणसी । राज्यातील पदवीधर निवडणूकीत भाजपचा मोठा पराभव झाला. हा पराभव पचवत असतानाच भाजपला अजून एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदार संघात देखील पदवीधर निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात भाजपच्या पराभवामुळे आता नरेंद्र मोदी यांची लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रासह वाराणसी येथेही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. दोन्ही मतदारसंघ भाजपला गमवावे लागले आहेत.

या दोन्ही ठिकाणी समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या एक दशकापासून या दोन्ही मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व होते. शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा हे 25351 मते आणि भाजपचे केदारनाथ सिंह यांना 22685 मते मिळाली आहेत.

ही निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची होती. १०० सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधान परिषदेत भाजपचे केवळ १९ आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाकडे ५२ आमदार आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.

महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर भाजपचा निभाव लागू शकला नाही. भाजपचा दणदणीत पराभव झाला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली.

नागपूरमधील पराभव हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जिव्हारी लागला आहे. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यामुळे आता मोदी लाट ओसरत असल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.