भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन !

दिल्ली | भाजपचे लोकप्रिय आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपाचार सुरू होते.

तारासिंह यांचे वय ८१ वर्षे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आज दुपारी मुलुंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तारासिंह हे अत्यंत लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिद्ध होते.

मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या तारासिंह यांनी मुलूंड विधानसभेचे बऱ्याच दिवस प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी जनसंघातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेण्याच्या दृष्टीने पहीले पाऊल टाकले

पूजा भट्टने ड्रग्स घेण्यामागचे सांगितले ‘हे’ विचित्र कारण; सोशल मिडीयावर ट्रोल

थेट ऊसाच्या फडातून सुप्रीया सुळेंच्या लेकीची राजकारणाच्या मैदानात धमाकेदार एंट्री

सुशांतला भीती होती रिया त्याला दिशाच्या केसमध्ये अडकवेल; कारण रियाला ‘ही’ गोष्ट माहीत होती..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.