बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झालेल्या भाजप आमदाराचा मुलगा मोदींवर संतापला; म्हणाला कित्येक फोन केले पण..

देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसाला लाखोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णांना बेड मिळत नाहीये, त्यामुळे उपचाराअभावी त्यांचा मृत्यु होत आहे.

आता या गंभीर परिस्थितीत भाजप आमदार केसर सिंग गंगवार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला २४ तास आयसीयुचा बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या आमदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लिहलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कोरोनाचा संसर्गा रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली जात आहे. पण याच परिस्थितीत रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे, असे केसर सिंग गंगवार यांनी पत्रात म्हटले होते.

विशेष म्हणजे सध्या भाजपचेच सरकार आहे, तरीही भाजपच्या आमदाराला बेड मिळाला नाही. त्यामुळे उपचाराअभावी त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या मृत्युनंतर हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

केसर सिंग यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा विशालने एक फेसबूक पोस्ट केली आहे, त्यावेळी त्याने भाजप सरकारवर संताप व्यक्त केला आहे. हेच का ते उत्तर प्रदेश सरकार, ज्यांना आपल्या आमदाराला उपचार करता आले नाही.

मी कित्येकदा मुख्यमंत्री कार्यालयात फोन केले पण कोणीही उचलला नाही. धन्य ते युपी सरकार, धन्य ते मोदीजी!, अशा शब्दांत विशालने भाजप सरकारवर संताप व्यक्त केला आहे. विशालची ही फेसबूक पोस्ट सध्या खुपच व्हायरल झाली आहे.

केसर सिंग गंगवार १८ एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना बरेलीच्या राममुर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांना २४ तासाच एकही आयसीयु बेड मिळाला नाही. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच त्यांना नोएडातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वडिलांनी जमीन विकून व्यवसाय करण्यासाठी दिले २० हजार, मुलाने उभी केली २४०० कोटींची कंपनी
लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला?, माजी प्राध्यापकाने कोरोना लस घेण्यास  दिला नकार
आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?; गोपीचंद पडळकरांचा राजेश टोपेंवर घणाघात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.