पवार-शहा भेटीच्या चर्चेनंतर भाजपा आमदाराने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; उडाली खळबळ

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील एक जुना व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, मै समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा … असे फडणवीस म्हणताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी – भाजप युती होणार?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. परंतु अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असे ते म्हणाले असते.

‘पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे,’ असेही पाटील म्हणाले.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला तुम्ही तयार असाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ‘मी सच्चा स्वयंसेवक आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल ते मला मान्य असेल. शेवटी पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि आज्ञा नेहमी पाळायची असते, असे सूचक विधानही पाटील यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या 

छातीची हाडे तुटली होती हृद्य आणि फुफ्फुसे तर डोळ्यांनी दिसत होते, अशावेळी धावून आला देवमाणूस

आनंद महिंद्रांनी लॉकडाऊनवरून राज्य सरकारला सुनावले परखड बोल; म्हणाले..

भाजपपाठोपाठ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध; मुख्यमंत्र्यांची कोंडी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.