मुंबई(Mumbai) अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काल राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.(bjp mla nitesh rane tweet on cm uddhav thakare)
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप(BJP) आणि राष्ट्रवादी(NCP) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यादरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “९३ च्या दंगली नंतर मुंबई मा. बाळासाहेबांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे. म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची”, असे ट्विट करत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1496688706904018945?s=20&t=XX5jHJfQZYthyiYmY4rl6A
या ट्विटमुळे नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटवर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक पोस्ट शेअर केली होती.
त्या पोस्टमध्ये दोन फोटो होते. या पोस्टमधील एका फोटोत नवाब मलिक हात बांधून उभे आहे. तर दुसऱ्या फोटोत ते हातवर करुन घोषणा देत आहे. नितेश राणे यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “छत्रपतींचा जयघोष करताना हातवर होत नव्हते, पण ईडीची कारवाई होताच लगेच हातवर केले. सध्या नवाब मलिकांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.”
मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडीची कोठडी सुनावल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप पाटील आणि राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी याबाबत बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रवादीने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
युद्ध सुरू! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा; बाकी देशांनाही दिला ‘हा’ गंभीर इशारा
हिजाब वाद: अभिनेत्याने न्यायाधिशांवरच उपस्थित केले प्रश्न, बोलला असं काही की पोलिसांनी ठोकल्या बेड्या