देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीची काल सांगता झाली. या बैलगाडा शर्यतीसाठी जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस( Devendra Fadanvis) देखील उपस्थित होते. (bjp mahesh landge organise bailgada shryat but win ncp mla sunil shelke )
भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे आणि राहुल जाधव यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बक्षिसे जिंकली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव रामनाथ वारिंगे यांचा बैलगाड्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने अवघ्या ११:२२ सेकंदात बैलगाडा घाट सर केला आहे. मावळमधील बाबुराव वायकर यांचा बैलगाड्याचा देखील पहिला क्रमांक आला आहे. त्यामुळे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. बाबुराव वायकर पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती होते. आठ वर्षानंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया बाबुराव वायकर यांनी दिली आहे .
बाबुराव वायकर यांच्या बैलजोडीने अवघ्या ११:३६ बैलगाडा घाट सर केला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा बैलगाडा दुसऱ्या क्रमांकात बसला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या बैलजोडीने अवघ्या ११:४० सेकंदात बैलगाडा घाट सर करत बोलेरो गाडी जिंकून दिली आहे.
https://twitter.com/UdayJad98918913/status/1532189922911784960?t=6jtUXcLWKaFPIR9TBSJd9g&s=08
यावेळी आमदार सुनील शेळके यांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. “भाजपच्या घाटात हा राष्ट्रवादीचा जलवा असला, तरी देखील राजकारणापलीकडे जाऊन मी या गोष्टीकडे पाहतो”, असे मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न होता म्हणून मी या बैलगाडा शर्यतीत सहभागी झालो, असे देखील आमदार सुनील शेळके म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहरातील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पुण्यासह अजूबाजूच्या बैलगाडा शर्यत शौकीनांनी हजेरी लावली होती. राज्यातील राजकीय दिग्गजांनी देखील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजेरी लावली होती. या बैलगाडा शर्यतीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाडामालकांनी सहभाग नोंदवला होता. या बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल दोन हजार टोकन वाटप करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :-
सिद्धू मुसेवालाच्या कुत्र्यांनीही सोडले खाणेपिणे; मुक्या जीवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील
बडे अच्छे लगते है’फेम अभिनेता नकुल मेहताची तब्येत बिघडली; तातडीने केलं रूग्णालयात ॲडमीट
क्रिकेटपटू दीपक चहर अडकला लग्नबेडीत, लुक पाहून चाहते घायाळ; पहा लग्नातील सुंदर फोटो