मध्य प्रदेशातून(Madhy Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाजप(BJP) आमदाराच्या सुनेने एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. माझा सेक्स स्लेव्ह म्हणून वापर करण्यात आला. लग्नाच्या सहा महिन्यानंतर मी जिवंत मृतदेहाप्रमाणे जगत होते, असा धक्कादायक आरोप तिने केला आहे. या वक्तव्यामुळे मध्यप्रदेशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(bjp mla daughter law dangerous aalegation on her husband)
नरसिंगपूरमधील भाजप आमदार जालम सिंह पटेल यांची सून नीतू सिंग हिने हे धक्कादायक आरोप केले आहेत. “आता मी दिल्लीत राहून एकटीच नोकरी करते आणि घटस्फोटासाठी कोर्टात लढत आहे”, असे तिने सांगितलं आहे. यासोबतच तिने घरच्यांवर आणि पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचे अनेक आरोप केले आहेत.
व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये नीतू सिंगने सांगितले आहे की, “माझे नाव नीतू सिंह ठाकूर आहे आणि मी दिल्लीत कुटुंबापासून वेगळी राहते. मी सध्या कोर्टात घटस्फोटासाठी लढत आहे.” आमदार जालम सिंह यांचा मुलगा मणिगेंद्र सिंह उर्फ मोनू सिंह याच्यावर जवळपास ४५ गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात दोषी आढळल्यामुळे तो सध्या तुरुंगात आहे.
नीतू सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी त्यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव आला होता. पण त्यांनी लग्नास नकार दिला. पण राजकीय दबावामुळे त्यांनी लग्नाला होकार दिला. तिचा होणारा नवरा धूम्रपान करत नाही किंवा मद्यपान करत नाही, अशी माहिती नितू सिंगला देण्यात आली होती.
“माझा होणारा नवरा पदवीधर आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे, असे मला कुटूंबियांनी सांगितले होते. पण लग्नानंतर सर्व सत्य समोर आले. माझ्या पतीवर खून, खुनाचा प्रयत्न असे ४५ गुन्हे दाखल आहेत. महिलांच्या इज्जतीचा त्याला काही फरक पडत नाही. तो महिलांना उपभोगाची वस्तू मानतो”, असे नितू सिंग यांनी सांगितले.
“माझ्या पतीने मला सतत मारहाण केली, मला एवढी मारहाण झाली की माझ्या शरीरात सर्वत्र जखमा झाल्या आणि सतत रक्तस्त्राव होऊ लागला, मारहाणीसोबतच पतीने माझ्यावर गोळीबार देखील केला. माझ्या सासूबाईंनी या सर्व गोष्टी पाहिल्या, पण त्यांनी मला शांत राहायला सांगितले”, अशी माहिती नितू सिंग यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :-
सुकेश चंद्रशेखरने दिली प्रेमाची कबूली; जेलमधून चिट्ठी पाठवत म्हणाला, जॅकलिनने माझ्यासोबत..
५० हजारांहून अधिक सापांना वाचवणाऱ्या स्नेक मॅनच्या मांडीचा कोब्राने घेतला चावा; भयानक व्हिडिओ व्हायरल
मुंबईत पोलिसांनी उद्ध्वस्त केले मोठे सेक्स रॅकेट, जबरदस्तीने तरुणींच्या शरीराचा व्हायचा सौदा