भाजपचे आमदार सतेज पाटलांच्या संपर्कात? वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठवलेला प्रस्ताव धुडकावत भाजपने तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. (BJP MLA contact congress leader Satej Patil)

महाविकास आघाडीने आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून घोडेबाजार केला जाणार आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. यादरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील(Satej Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

“महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही. त्यामुळे भाजपने आपले आमदार सांभाळले पाहिजेत”, असे वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपचे आमदार काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभेची निवडणूक भाजपने लादली आहे, असे काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करेल. भाजपने राज्यसभेची निवडणूक लादली आहे. ही निवडणूक बिनविरोध करणं अभिप्रेत होतं. महाविकास आघाडीकडे क्लियर नंबर आहेत. मतांद्वारे विजय स्पष्ट होईल. या सरकारला कुठलाही धोका नाही. उलट भाजपाचीच मतं बाजूला जातील”, असे सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

काँग्रेस पक्षातील नेते नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या विषयावर देखील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी भाष्य केलं आहे. “काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. इम्रान प्रतापगढी हे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते आहेत. त्यामुळे इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे”, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले की, “भाजपच्या विखारी प्रचाराला काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे”, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सांगितले आहे. नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रस्तावावर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठवलेला प्रस्ताव भाजप पक्षाने धुडकावला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सेक्स दरम्यान प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत घडला भयानक प्रकार, व्हावे लागले रुग्णालयात दाखल
९ रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर शेअरने दिला तब्बल ३६४० टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल
सौरव गांगुलीने राजीनाम्याचा प्रँक केल्यानंतर चाहत्यांनी केले ट्रोल, भन्नाट मीम्सचा पडला पाऊस