Share

‘असदुद्दीन ओवेसी माझे जुने मित्र, ते क्षत्रिय आहेत आणि रामाचे वंशज आहेत’, भाजप खासदाराचा अजब दावा

Assudin-owesi.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये(Uttar Pradesh) विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यादरम्यान कैसरगंजचे भाजप(BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी एक अजब विधान केलं आहे. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.(bjp mla brijbushan singh conterversial statement on assudin owesi)

भारतीय कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी एमआयएम(MIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी(Assudin Owesi) इराणवाले नसून ते भगवान श्री रामाचे वंशज आहेत, असा दावा केला आहे. यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी असदुद्दीन ओवेसी हे आपले जुने मित्र आहेत, असे सांगितले.

भाजप पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, “असउद्दीन ओवेसी यांची लढाई ही अखिलेश यादव यांच्याशी आहे. कारण अखिलेश यांना मुस्लिमांची मते हवी आहेत.”

“अखिलेशने वडिलांचा आणि काकांचा विश्वासघात केला आहे. फसवणूक करणे हे अखिलेश यादव यांचे काम आहे. या निवडणुकीत असउद्दीन ओवेसी आणि अखिलेश यांच्यात लढत होणार आहे. ही लढत मुस्लिम नेतृत्व कोणाच्या हातात असावे यावरून आहे”, असे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या सभेत खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मुलाला मतदान करण्याचे आवाहन केले. या सभेत खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेस पक्षात चालणाऱ्या घराणेशाहीवर देखील टीका केली. काँग्रेस पक्ष आधी राजीव गांधी चालवत होते, त्यानंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी चालवत आहेत, अशी टीका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली आहे.

भाजपसाठी मते मागताना ब्रिजभूषण यांनी हिजाबला पाठिंबा देणाऱ्यांचा देखील खरपूस समाचार घेतला. ‘हिजाबच्या मुद्द्यांवर बोलून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे त्यांनी सांगितले. भाजप पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘मी शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे’, अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
वाढदिवशीच झाला दुर्दैवी अपघात! दोन वर्षाच्या मुलीचा सांबारच्या पातेल्यात पडून मृत्यू
भावासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या बहिणीचा भयानक अंत, रस्त्यावर आपटून गेला जीव

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now