राज्यसभेच्या निवडणुकीत राजस्थानमधील भाजप आमदारांनी मते देताना गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील भाजपच्या एक आमदाराने काँग्रेसच्या(Congress) उमेदवाराला मत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच भाजप पक्षातील एका आमदाराने मत देताना दुसऱ्याच भाजप उमेदवाराला मतदान केलं आहे.(BJP lost hope of another candidate due to cross-voting of MLAs)
त्यामुळे ही दोन्ही मते बाद करण्यात यावीत, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. या गोंधळामुळे भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारे उमेदवार अडचणीत सापडले आहेत. राजस्थानमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत. पण या गोंधळामुळे सुभाष चंद्रा यांची निवडणूक जिंकण्याची शक्यता धूसर झाली आहे.
राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी यासंदर्भात कबुली दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा एकच उमदेवार निवडून येईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी सांगितले आहे. आमचे दोन्ही उमदेवार निवडून येतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी केला होता.
पण आता सतीश पुनिया यांनी याबाबतीत यु-टर्न घेतल्याचे समोर आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आमदार शोभरानी कुशवाह यांनी प्रमोद तिवारी या काँग्रेस उमेदवाराला मत दिले. त्यामुळे हे मत बाद ठरवण्यात आले आहे. तसेच भाजपचे दुसरे आमदार सुभाष सिद्दीकी यांनी भाजप पुरस्कृत सुभाष चंद्रा यांना मतदान करण्याऐवजी घनश्याम तिवारी या भाजप उमेदवाराला मतदान केले आहे.
यावेळी कैलास मीना या भाजप आमदाराने आपलं मतं प्रदेशाध्यक्षांना दाखवलं आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. हे मतं बाद करण्यात यावे, अशी मागणी देखील काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाची ही दोन्ही मते बाद केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याचा फटका भाजप पुरस्कृत उमेदवार सुभाष चंद्रा यांना बसणार असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानमध्ये सध्या राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील दोन जागांवर काँग्रेस पक्ष बाजी मारू शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच भाजप एक जागा जिंकू शकतो. चौथ्या जागेसाठी भाजप पुरस्कृत सुभाष चंद्रा आणि काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
धक्कादायक घटना; बलात्काराच्या आरोपींना गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून दिले पेटवून
ICC कसोटी क्रमवारी: भारताच्या गोलंदाजांना मोठा झटका, तर रोहित, विराट घसरले या स्थानावर
रिकी पॉन्टिंगने दिल्ली नाही तर ‘या’ संघाशी केला ३ वर्षांचा करार, दिल्ली कॅपिटल्सला आले टेंशन