“सुशिक्षित लोकं जास्त असल्याने भाजपला मते मिळत नाहीत”; भाजप नेत्याची कबुली

नवी दिल्ली | देशातील केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होणार आहे. निवडणूकीत काँग्रेस, भाजपसह अनेक स्थानिक पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अशातच केरळमधील भाजपचे नेते आणि आमदार ओ राजगोपाल यांनी पक्षाविरोधातचं धक्कादायक विधान केलं आहे.

इंडियन एकस्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओ राजगोपाल म्हणाले, “भाजप केरळमध्ये पुढे चालला आहे. केरळमध्ये 90 टक्के जनता साक्षर आहे. त्यामुळे लोक भाजपला मतदान करत नाहीत. राज्यातील लोक विचार करणारे आहेत. शिक्षित लोकांच्या या सवयी आहेत.”

पुढे म्हणाले, राज्यात 55 टक्के लोक हिंदू आहेत, तर 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे केरळची तुलना इतर राज्यांशी केली जाऊ शकत नाही. येथील परिस्थीती वेगळी आहे. पण आम्ही चांगलx करण्याचा प्रयत्न करतोय.” असं भाजप नेते राजगोपाल यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या नेत्याच्या या वक्तव्याने विरोधी पक्षांना टीका करण्याची चांगलीच संधी सापडली आहे. काँग्रेसने ट्विट करत म्हटलं की भाजप खोटं बोलतोय हे संपुर्ण देशाला माहित होत आहे. भाजपने लोकांना जे स्वप्न दाखवलं होतं. त्या पध्दतीने भाजप काम करत नाही. फक्त केरळचं नाही. संपुर्ण देश भाजपला मतदान करणार नाही.

दरम्यान केरळमध्ये 140 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शाहा स्वत: प्रचाराला उतरले आहेत. भाजपला या निवडणूकीत कितपत यश मिळते. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…तर त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
प्रत्येक चेंडू खेळताना माझ्या मनात तुमचाच विचार होता,पप्पा ही खेळी तुमच्यासाठीच’
अमृता खानविलकरचा कातिलाना अंदाज; फोटो सोशल मिडीयावर झाल्या व्हायरल
मते मिळवण्यासाठी उमेदवाराचा अनोखा फंडा, मतदारांचे धुत आहेत कपडे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.