बॉलिवूड स्टार्सच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातीचा मुद्दा जोर धरू लागला आहे. अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) ते अजय देवगण(Ajay Devgn), अक्षय कुमार, शाहरुख खान यांसारखे टॉप स्टार अशा जाहिरातींमध्ये दिसले आहेत. आता गोवा भाजपच्या वैद्यकीय सेलचे निमंत्रक शेखर सालकर यांनी बुधवारी नरेंद्र मोदींना तंबाखू उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या सरोगेट जाहिरातींमध्ये सहभागासाठी पद्म पुरस्कारांपासून वंचित ठेवण्याची विनंती केली.(bjp-leaders-angry-after-seeing-akshay-shah-rukh-and-ajay-in-vimals-ad)
सालकर यांनी ट्विट केले की, ‘अक्षय कुमार आता अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्या टोळीत सामील होऊन तंबाखूजन्य पदार्थांच्या सरोगेट जाहिरातींद्वारे कॅन्सरला प्रोत्साहन देत असल्याची टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. दुःखाची गोष्ट म्हणजे ते पद्म पुरस्कार विजेते आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, ‘@PMOIndia फिट इंडिया मूव्हमेंटद्वारे देशाला निरोगी बनवण्यासाठी ओव्हरटाईम करत आहे, पण या जाहिरातींद्वारे तरुण पिढीला तंबाखूच्या आहारी लावणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या या तथाकथित प्रभावशाली लोकांमुळे हे संपूर्ण मिशन उद्ध्वस्त होत आहे. हे कलाकार खरोखरच पद्मश्रीला पात्र आहेत का?’
सालकर पुढे म्हणाले, ‘पैसा कमावण्याच्या शर्यतीत आपला आत्मा आणि नैतिकता विकून त्या निष्पाप तरुणांचे मन पणाला लावणाऱ्या या कुप्रसिद्ध, निंदनीय अभिनेत्यांवर लोकांनी विश्वास टाकला आहे. हे तरुण त्यांना फॉलो करतात आणि त्प्रयांच्भायावर व टाकतात.
नुकताच अक्षय कुमार विमलची जाहिरात करताना दिसला होता, ज्यानंतर तो सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आहे. अक्षय ज्या घातक प्रॉडक्ट्सची जाहिरात करताना दिसत आहे ती जाहिरात त्याच्या चाहत्यांना आवडली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
प्रसाद ओकच्या रुपात आनंद दिघेंना पाहून एकनाथ शिंदे भावूक, व्यासपीठावर झाले नतमस्तक
CSK Vs MI : ‘धोनी शांत राहून गेम करतो’, सातव्या पराभवानंतर रोहितने सांगितलं पराजयाचं कारण
सुशांत सिंह राजपूतपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत, या कलाकारांनी मृत्यूनंतर दान केली त्यांची संपत्ती
गणेश नाईकांच्या ‘त्या’ प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे; आपल्या मुलांचा दाखला देत म्हणाल्या..