कोण म्हणतो सरकार पाच वर्षे चालणार नाही म्हणत ठाकरेंना पाठींबा देणारे एकमेव भाजप नेते

महाराष्ट्रचे दिग्गज नेते आणि भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचे निधन झालं आहे. आज सकाळी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांचा एक किस्सा आज आपण पाहणार आहोत.

सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगरपालिकेतून झाली होती. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. सरदार तारा सिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग अनेक वर्ष प्रतिनिधित्त्व केले होते. मुलूंड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

२०१८ साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. गेल्यावर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती.

विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते. तारासिंह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते, मात्र ही भेट होऊ शकली नाही. शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे सरदार तारासिंह यांनी सांगितले.

पंजाब नॅशनल बँक कथित घोटाळ्या प्रकरणी तारसिंग यांचा मुलगा अटकेत होता. भाजपने तिकीट कापल्यामुळे तारासिंग नाराज असल्याचे बोललं जात होतं. त्यांच्याजागी उमेदवारी दिलेल्या मिहीर कोटेचा यांच्या प्रचारातही ते उतरले नव्हते.

‘उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो, पण भेट झाली नाही. PNB बँकेबाबत भेट घेण्यासाठी नाही तर शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल. कोण म्हणतो सरकार चालणार नाही?’ असा सवालच सरदार तारासिंह केला होता.

सरदार तारासिंह यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.