मुंबई | ‘अशा प्रकारचे स्टेटमेंट मी दिलेले नाही मी कधीही असे बोलत नाही. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तात्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी. हे अत्यंत अयोग्य आहे व हे वारंवार होण्याबद्दल मला खंत वाटते, असे भाजप नेत्या पंकजा मुंढे यांनी म्हंटले आहे.
पंकजा मुंढे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर चुकीचे वृत्त दिले असल्याचा आरोप केला आहे. ‘मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार परवडत नाही,’ अशी टिका पंकजा मुंढे यांनी हिंगोलीत केले असल्याचे वृत्त एबीपी माझा प्रसारित केले होते.
अशा प्रकारचे स्टेटमेंट मी दिलेले नाही मी कधीही असे बोलत नाही. @abpmajhatv तात्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी. हे अत्यंत अयोग्य आहे व हे वारंवार होण्याबद्दल मला खंत वाटते. pic.twitter.com/CrjjY3k5zs
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 26, 2020
काय आहे पंकजा मुंढे यांचा आरोप…
‘मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार परवडत नाही,’ अशी टिका पंकजा मुंढे यांनी हिंगोलीत केले असल्याचे वृत्त एबीपी माझा प्रसारित केले होते. यावरून एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तात्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
संबंधित बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रकाशित झाली होती. चॅनेलवरुन ही बातमी प्रसारित झालेली नाही. एबीपी माझाच्या सर्व डिजिटल हँडलवरुन ही बातमी काढून टाकण्यात आलीय. चुकीची बातमी देणाऱ्या संबंधित प्रतिनिधीवर कठोर कारवाई करण्यात आलीय. आपल्याला झालेल्या मनस्तापाबद्धल दिलगीर आहोत https://t.co/7iVcECe2hm
— ABP माझा (@abpmajhatv) November 27, 2020
‘एबीपी माझा’कडून स्पष्टीकरण…
संबंधित बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रकाशित झाली होती. चॅनेलवरुन ही बातमी प्रसारित झालेली नाही. एबीपी माझाच्या सर्व डिजिटल हँडलवरुन ही बातमी काढून टाकण्यात आलीय. चुकीची बातमी देणाऱ्या संबंधित प्रतिनिधीवर कठोर कारवाई करण्यात आलीय. आपल्याला झालेल्या मनस्तापाबद्धल दिलगीर आहोत.’
महत्त्वाच्या बातम्या
कंनगा राणावतबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, सोडून द्या..
‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’, शहीद जवानाचा अखेरचा संवाद वाचून डोळे पाणावतील
‘अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं’