Share

उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत कारण.., डिस्चार्ज मिळताच सोमय्या बरसले

Kirit-sommya-Uddhav-Thakare.j

भाजपा नेते(BJP) किरीट सोमय्या(Kirit Sommya) यांच्यासोबत पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप आणि शिवसेनेतील(Shivsena)वादाने आक्रमकाची भुमिका घेतली आहे. याचं पार्श्वभुमीवर किरीट सोमय्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी राज्य सरकारवर आपल्या खोचक शब्दांमधून हल्लाबोल केला आहे.(bjp leader kirit sommya statement on cm uddhav thakare)

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी आपला आक्रोश व्यक्त करत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी, “किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता. हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती,” असा आरोप ठाकरे सरकारवर लावला आहे.

इतकेच नव्हे तर, “उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं”, अशी जोरदार टीका सोमय्या यांनी केली आहे.

“उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं,” असे देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

दरम्यान पुणे महापालिकेत आलेल्या किरीट सोमय्याची शिवसैनिकां सोबत धक्काबुक्की झाल्यानंतर राजकिय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य म्हणजे याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला सोमय्यांसोबत भाजप नेते देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
रुपाली पाटलांनी केले फडणवीसांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या, ‘ही’ राजकीय सुंदरता टिकवली पाहिजे
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत”
पंतप्रधान मोदींना येताना पाहताच शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे उठले आणि…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now