भाजपला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

अशाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत आहेत. बुधवारी बारामती येथे अजित पवार यांच्याशी झालेल्या अंतिम चर्चेनंतर काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला. गुरुवारी अजित पवार यांच्या दौऱ्यात ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागताच खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी दुपारी कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात मनधरणीसाठी गेले होते. मात्र खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी अजितदादांबरोबर ठरलंय? असा निरोप दिल्यानं निंबाळकर परतले.

दरम्यान, कल्याणराव काळे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटलं होतं. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले.

आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हणणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांचा अर्धनग्न व्हिडीओ झाला व्हायरल

शिक्षण पण घ्या आणि करिअरसुद्धा घडवा: डिग्री नसलेल्या मुलांना टेस्ला करणार भरती

‘माझ्या वडिलांना सोडा’, नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.