‘माझ्या मुलीला ड्रग्ज प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याने अडकवलं’

कोलकत्ता | भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी लाखो रूपयांच ड्रग्ज घेऊन जाताना अटक केली आहे. यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी भाजपवर टिका करत पामेला गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“मी गांजाही विकत होतो, तू येतोस का चिलीम लावायला”

भाजपच्या युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी यांच्यासह भाजपचाच युवा नेता प्रबीर कुमार डे आणि केंद्रीय सुरक्षा दलाचा जवान सोमनाथ असे तिघेजण एका कारमध्ये जात असताना पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमधून १०० गॅंम ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

स्वत:ची फसवणूक टाळा! ‘या’ कंपनीकडून वाहन इन्शुरन्स घेऊ नका, IRDAI चा इशारा

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पामेलाच्या वडिलांनी गेल्या काही दिवसांपुर्वी पामेलाचे आणि युवा नेता प्रबीर कुमारचे प्रेमसंबंध होते आणि प्रबीरने आपल्या मुलीला ड्रग्जचं व्यसन लावल्याची तक्रार दाखल केली होती.

रिअल हिरो! सैनिकांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी रॅंचोने बनवलं अनोखं टेंट

त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, प्रबीर कुमारचं लग्न झालं असून त्याला एक मुलगी आहे. तरीसुध्दा त्याने माझ्या मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि तिला ड्रग्जचं व्यसन करायला भाग पाडलं. यामध्ये मी अनेकवेळा प्रबीरला समजावून सांगितले पण त्याने माझं ऐकलं नाही. तसेच माझ्या मुलीला यातून वाचवावे अशी विनंतीही त्यांनी पोलिसांना केली होती.

भाजपच्या बड्या महीला नेत्याच्या गाडीतून ९० लाखांचे ड्रग्ज जप्त; राजकारणात खळबळ

तक्रारीवरून पोलिसांनी पामेला गोस्वामी आणि तिचा प्रियकर प्रबीर कुमार दोघांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. पोलिसांनी तपास करून दोघांना सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान पामेला गोस्वामी यांचे प्रेमप्रकरण त्यांना महागात पडल्याचं बोललं जात आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.