“जर पाय दाखवायचा असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा”, भाजप नेत्याची ममता बॅनर्जींवर टीका

पश्चिम बंगाल | देशातील केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालवर सत्ता स्थापनेसाठी भाजपचे मोठे नेते बंगालमध्ये ठाण मांडून बसले आहेत. अशातच भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

प्रचारसभेत घोष यांनी म्हटले की, “प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही.”

पुढे म्हणाले, “जर त्यांना पाय दाखवायचा असेल तर, त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामूळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल.” असं घोष यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते घोष यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच नाव न घेता त्यांनी विधान केलं असलं तरी त्यांनी ममता बॅनर्जी यांनाच उद्देशून हे वादग्रस्त विधान केलं असल्याचं बोललं जात आहे.

भाजप नेत्याच्या वक्तव्यानंतर तृणमुल काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तृणमुल काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये आगामी काळात जोरदार शाब्दिक युद्ध रंगणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी एप्रिल-मे महिन्यात निवडणूका होणार आहेत. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
देवमाणूस! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना, आता गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार
“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”
गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.