‘आताची शिवसेना ही नक्कीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असूच शकत नाही’

मुंबई : अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत कट्टर हिंदुत्वावादी पक्ष अशी ओळख असेलेल्या शिवसेनेची युती एमआयएमसोबत झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना आणि एमआयएमच्या या युतीवर भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे. भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी याबाबत बोलताना शिवसेनेला लक्ष केले आहे. पाण्डेय यांनी टीका करताना मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेची आठवण करून दिली आहे.

ते म्हणतात, ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर ठेवण्यासाठी सत्तेचा विचार करणारी, टिपू सुलतान ची जयंती साजरी करणारी, आणि आता अमरावतीत AIMIM सोबत आघाडी स्थापन करणारी ही शिवसेना नक्कीच हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असूच शकत नाही.’

दरम्यान, ‘उध्दव जी AIMIM हा तोच पक्ष आहे ज्याच्या एका नेत्याने वक्तव्य केलं होतं की १५ मिनिटांसाठी या देशातील पोलीस बाजूला ठेवा, आम्ही हिंदूंचे काय हाल करू हे पूर्ण देश पाहील. आणि आज आपण त्या AIMIM सोबत सत्ता स्थापनेसाठी त्यांच्या सोबत आघाडी करता आहात,’ अशा शब्दात पाण्डेय यांनी लक्ष केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बॉलीवूडचे हॅंडसम हंग विनोद खन्नाच्या वडीलांनी ताणली होती त्यांच्यावर बंदूक; कारण ऐकून थक्क व्हाल

इंग्लंडवरील दणदणीत विजयानंतर पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमारने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला….

इंग्लंडवरील दणदणीत विजयानंतर पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमारने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.