भाजप नेत्याने पोलिसांना केली मारहाण; मास्क न घालण्यावरून झाला वाद

भाजप नेत्याने आपल्या भावाच्या मदतीने पोलिसांसोबत हुज्जत घालून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी इथे हा प्रकार घडला.

भररस्त्यात रात्री भाजप नेता आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणाची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भाजप नेत्यासह साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. वाराणसीच्या लंका पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क न घालता फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना रोखले. भाजप जिल्हा पंचायत सदस्य सुरेंद्र पटेल आणि त्यांचे बंधू बिंदू पटेल यांच्यासह इतर काही लोक तेथे आले.

त्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. भांडणाचे रुपांतर हाणामारीपर्यंत गेल्याने प्रकरण वाढले. पोलिसांना याप्रकरणी मारहाण करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.