Share

Prostitution: वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली भाजप नेत्याला अटक, नंतर फार्महाऊसवर सापडली स्फोटकं

Bernard - N - Marak

वेश्याव्यवसाय (Prostitution): वेश्यागृह चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप नेते बर्नार्ड एन माराक यांच्या फार्म हाऊसमधून स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बर्नार्डच्या फार्म हाऊसमधून ३५ जिलेटिन काठ्या, १०० डिटोनेटर, चार क्रॉस-बो आणि १५ बाण जप्त करण्यात आले आहेत.(Prostitution, BJP Leader, Arrest, Bernard N Marak, Farm House, Explosives, 35 Gelatin Sticks, 100 Detonators, Four Cross-bows, 15 Arrows)

विशेष म्हणजे मेघालयातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याला उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये अटक करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांनी मेघालयातील तुरा येथील बर्नार्ड एन मारक यांच्या ‘रिम्पू बागान’ या फार्महाऊसवर छापा टाकला होता. त्यादरम्यान फार्म हाऊसमधून सहा अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली.

यासोबतच गर्भनिरोधकांची ५०० पाकिटे, आक्षेपार्ह वस्तू आणि डझनभर वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. त्याचवेळी माराकच्या फार्महाऊसमधून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर मेघालय पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रत्यक्षात सुटका करण्यात आलेल्या मुलांचे कपडे आणि पुस्तके गोळा करण्यासाठी पोलिसांचे पथक फार्महाऊसवर पोहोचले होते. यादरम्यान पोलिसांना फार्महाऊसचा एक छोटा दरवाजा सापडला, जो तुटलेला होता आणि आतमध्ये बरीच स्फोटके आणि इतर शस्त्रे सापडली.

त्याचवेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी बर्नार्डबद्दल म्हटले आहे की, पोलीस या प्रकरणात आपले काम करत आहेत. मला यात काही बोलायचे नाही. पोलिसांना ज्या पद्धतीने पुरावे मिळत आहेत, ते आपले काम करत आहेत. या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे राजकारण होत असल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला होता.

याप्रकरणी जी काही कारवाई होईल ती कायद्यानुसारच होईल, असे ते म्हणाले. फरार असताना बर्नार्डने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्याने हे सर्व फसवणुकीचे आरोप असल्याचे म्हटले होते. मी कोणतेही वेश्यागृह रॅकेट चालवलेले नाही.

२०१७ मध्ये मारक पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्यांनी पशु बाजारात कत्तलीसाठी गुरांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ भाजप सोडला. मात्र, नंतर ही अधिसूचना मागे घेण्यात आली. नंतर बर्नार्ड एन. माराक यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला मात्र यावेळी पक्षासाठी आणखी एक लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
तुम्ही बंडखोर नाही, तुम्ही तर हरामखोर आहात, दरोडेखोर आहात; उद्धव ठाकरे कडाडले
बंगालमध्ये मिळाला होता नोटांचा डोंगर, पुर्ण देशात उडाली होती खळबळ, वाचा त्या घोटाळ्याची कहाणी
Saif Ali Khan: सैफ अलीच्या सपोर्टशिवाय तान्हाजी चित्रपट बनलाच नसता, दिग्दर्शक ओम राऊतांचा खुलासा

क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now