रोहित पवारांच्या ‘त्या’ फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; भाजपनेही केली जहरी टीका..

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाचे आता राज्यात देखील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटू लागले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या या शेतकरी कायद्यांना राष्ट्रवादीने देखील कडाडून विरोध दर्शविला आहे.

अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या कॉन्ट्रॅक फार्मिंगचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. याचाच धागा पकडत भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष केले आहे. हा दुटप्पीपणा किळसवाणा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हंटले आहे की, ‘शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला. हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे,’ अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सध्या हे पोस्टर्स सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत. अनेकांनी या पोस्टर्सवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसला धारेवर धरले आहे. एकीकडे शेतकरी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याच शेतकरी कायद्यातील तरतूदींनूसार आपल्या कंपनीद्वारे कॉन्ट्रॅक फार्मिंग करायचे, अशा प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
“कोणी किती मोठ्या बापाचा असो किंवा छोट्या बापाचा, मला देणेघेणे नाही”
शेतकऱ्यांचं आंदोलनाबाबत रामदास आठवले यांचं खळबळजनक विधान, म्हणाले…
नकलीपणाच्या ‘त्या’ आरोपावर रोहित पवारांचे निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.