शिवसेना(Shivsena) नेत्यांचे घोटाळे उघड केल्यामुळे आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला, असा आरोप भाजप(BJP) नेते किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी केला आहे. गुरुवारी दिल्लीत भाजप पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजप पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे.(bjp kirit somyya big statemnt on udhv thakare & sanjay raut)
भाजप पक्षाच्या या शिष्टमंडळात किरीट सोमय्या यांच्यासह खासदार गिरीश बापट, मनोज कोटक, गोपाल शेट्टी आणि खासदार रक्षा खडसे यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणावर महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीला ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात कंत्राटे दिली होती. त्याचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे शिवसैनिकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मदतीने संगनमत करून हा कट रचला”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
‘किरीट सोमय्या यांच्यावर केलेला हल्ला हा गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करावी’, अशी मागणी भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आले होते.
यावेळी काही शिवसैनिकांनी पुणे महापालिका परिसरात भाजप नेते किरीट सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना धक्क्काबुकी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप पक्षाकडून करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले होते. यामध्ये त्यांना दुखापत देखील झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही शिवसैनिक भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
हिंगणघाट जळीतप्रकरणातील आरोपीला जन्मठेप; एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जिवंत जाळले होते
बंदुकीच्या धाकावर नग्न करून, लोकांना अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावणारी टोळी अखेर गजाआड..
मोदींमुळे उध्वस्त झालो; कर्जबाजारी व्यापाऱ्याने लाईव्ह व्हिडीओ करत कुटुंबासह घेतले विष