राज्यसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. राज्यसभेची सहाव्या जागेची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे.(bjp-kirit-somaiya-tweet-about-shivsena sanjay-raut)
आत विधान परिषदेच्या निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut)
यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे करणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांनी लिहिले आहे की, “आज मी दिल्लीला जाणार आहे. संजय राऊत यांच्या आमदारांना धमकी देण्याच्या प्रकरणाची आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची खासदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे.”
“संजय राऊत यांनी सहा आमदारांची नावे उघड केली आहेत. त्यांनी आपला विश्वासघात केला आहे. त्या आमदारांनी शिवसेनेला दिलेल्या वचनानुसार मते दिली नाहीत, असे संजय राऊत म्हणाले आहेत. हे कायद्याच्या विरोधात आहे.”, असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली आहे. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.
I am going to Delhi today to
Request Election Commission to inquire threatening MLA's & corrupt practices by Sanjay Raut & cancel his election
"Sanjay Raut disclosed names of half dozen mla’s & stated they have betrayed him & has not given votes as promised to him, shivsena"
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 13, 2022
निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीला जाणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपने घोडेबाजार करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता.
यावेळी आरोप करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही आमदारांची नावे घेतली होती. त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांचे नाव देखील समाविष्ट होते. यावरून अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना चांगलेच सुनावले होते. संजय राऊत ब्रम्हदेव आहेत का हे समजत नाही.मतदान हे गोपनिय असते. आम्ही त्यांना मत दिले नाही हे त्यांना कसे कळले?”, असा सवाल अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
‘तुम्ही सिनेमागृहात आलात का?’ हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याला फटकारले; व्हिडिओ झाला व्हायरल
दहावीला इंग्रजीत ३६, विज्ञानात ३८, गणितात ३६ गुण, तरीही झाले कलेक्टर; कसा केला कारनामा? वाचा..
सलग दुसऱ्या पराभवनंतर कर्णधार ऋषभ पंत झाला लालबुंद, ‘या’ खेळाडूंवर काढला सगळा राग