‘भाजप मराठा आरक्षणाविरोधात छुप्या कारवाया करून राजकीय कारस्थान रचत आहे’

 

 

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट सुरू आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून राज्यात राजकिय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज सरकार आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपण सुरू आहे.

 

आता मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर मराठा आरक्षणावरून जाणीव पूर्वक धादांत खोटे आरोप लावले जात आहे.

 

तसेच झालेल्या आंदोलनाचा धनी वेगळा असून ही आंदोलने भाजप पुरस्कृत आहे, असा थेट आरोप अशोक चव्हाण यांनी भाजपवर केला आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या तयारीबाबत माध्यमांशी संवाद साधला होता, त्यावेळी ते बोलत होते.

 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे.

 

तसेच मराठा आंदोलनातील अनेक प्रमुख नेत्यांशी, वकिलांशी,  अभ्यासकांशी व्हीसीद्वारे अनेकदा चर्चा झाली आहे. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात छुप्या कारवाया सुरू आहे.

 

त्यामुळेच राज्य सरकारवर बिनबुडाचे आरोप केले जात आहे.  मराठा आरक्षण लागू होऊ नये, असा हेतू असलेल्या मंडळींचे हे कारस्थान आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.