हिंदुंच्या सणांना ठाकरे सरकाचा विरोध का? सरकारच्या नव्या नियमांविरोधात भाजप आक्रमक

मुंबई | राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने आता करोना प्रतिबंधात्मक नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी केली आहे.

होळी आणि धुलीवंदनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. पण कोरोनामुऴे सण साजरी करण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहे.राज्य सरकारच्या निर्बंधाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.

भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी ट्विट करत राज्य सरकारला सवाल विचारले आहेत. हिंदु विरोधी ठाकरे सरकार म्हणतेय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची का? ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे का?

लोक रंगपंचमी समजु शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचे पालन करत होळी पेटवली आणि हिंदु बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? असा संतप्त सवाल कदम यांनी केला आहे.

 

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने नियम आणखी कडक केले असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. नव्या गाईडलाईन्स नुसार राज्यात रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल.
महत्वाच्या बातम्या-
‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना झोडपले; थेट लायकीच काढली
दीपाली चव्हाणांचं आत्महत्येपूर्वी नवरा आणि आईसाठी भावनिक पत्र; पत्रात धक्कादायक गौप्यस्फोट
लक्षात ठेवा! ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.