Share

आधी भाजपमध्ये प्रवेश करा मगच सरकार स्थापण करू; भाजपने एकनाथ शिंदेंना घातली अट

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.(BJP imposed condition on Eknath Shinde)

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीला सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक अट ठेवली आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?”, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व आमदार गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे आणखी ६ आमदार ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे सांगितले जात आहे.

कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री आणि आमदार संजय राठोड, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर आणि दिलीप लांडे ‘नॉट रिचेबल’ झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे हे सर्व आमदार शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी ८ ते ९ खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात, असे सांगितले जात आहे. वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पत्र लिहीलं होतं. हे पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलं होतं. बंडखोर आमदारांवर कारवाई करू नका, अशी विनंती खासदार भावना गवळी यांनी या पात्रातून उद्धव ठाकरेंना केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग आम्हाला अयोध्येला जाण्यापासून का अडवलं? बंडखोर आमदारांचा ठाकरेंना सवाल
मोठी बातमी! शिवसेनेचे ८ ते ९ खासदाराही शिंदेंसोबत बंडखोरीच्या मार्गावर, ‘ही’ नावं आहेत आघाडीवर
VIDEO: पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी.., सध्याच्या राजकारणावर काय म्हणाली प्राजक्ता माळी?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now