‘भाजपला सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मजा वाटते’

मुंबई । रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता देशात राजकारण तापले आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार टीका टिप्पणी सुरू झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या आणीबाणीसारखीच आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक म्हणजे वैयक्तीक स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे.

स्वतंत्र माध्यमांनी या कारवाईला विरोध करायला हवा. ही घटना आणीबाणीची आठवण करून देते. असे ट्वीट त्यांनी केले आहे. यावरून शिवसेना नेत्यांनी देखील अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. शहा यांच्या ट्विटला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सावंत म्हणाले, “अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेशी काय संबंध? एका खासगी व्यवसायिकेचे पैसे न दिल्याने आणि त्याने आत्महत्या केल्याने गोस्वामी यांना अटक झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी माहिती घेऊन बोलावे.” असे त्यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने लोकशाहीची लाज काढली अशी टीकाही त्यांनी केली आहे. हे प्रकरण आता अजून गाजण्याची शक्यता आहे. अर्णब गोस्वामी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेत आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजपला सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते असे या अग्रलेखात म्हटले आहे. या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.