शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत; भाजपाचा हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड केली. यावेळी शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला.

यावरून भाजपाने थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणं हे गंभीर आहे. हे सरकार नालायक आहे, कुंपणच शेत खायला निघालंय, अशी परिस्थिती आहे,’ असा टोला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘अनिल देशमुख यांच्या सर्व क्लिप आल्यावर सगळं सत्य पुढे येईल. शरद पवार हे क्लीनचिट द्यायला न्यायाधीश नाहीत. ते कॉंग्रेसला लिंबू टिंबू समजतात, कॉंग्रेसला गृहीत धरले जात नाही, याची किंमत कॉंग्रेसला येत्या काळात चुकवावी लागेल.’

…त्यामुळे देशमुख राजीनामा देणार नाहीत
काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुली टार्गेटच्या आरोपांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, हा प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असे सांगितले. परमबीर सिंग यांनी आरोप केलेत त्या काळात अनिल देशमुख कोरोना झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात दाखल होते.

त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. जे आरोप केले त्यात तथ्यच नाही, मग चौकशीचा मुद्दा येतो कुठून, अनिल देशमुखांना हटवण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

‘परमबीर सिंग नावाचं जे रसायन आहे, हेच मुळात भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे’

६० हजार कोटींचा तेलगी घोटाळ्याप्रकरणी परमबीरसिंग अडचणीत? अधिकाऱ्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

अजित पवारांची आयोजित केली सभा, अन् दाखल झाला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाविरोधात गुन्हा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.