Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

भाजपाचा मुख्यमंत्र्यांना इशारा; धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा….

Dhanashri Rout by Dhanashri Rout
January 13, 2021
in इतर, ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0
भाजपाचा मुख्यमंत्र्यांना इशारा; धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा….

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सदर तरुणीचा दावा आहे.

याच प्रकरणावरून भाजपाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. ‘सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा,’ अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केली आहे.

तसेच त्या पुढे बोलताना म्हणतात, ‘कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी,’ असा इशारा उमा खापरे यांनी दिला आहे.

…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही
या प्रकरणावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ‘धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे,’ ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही; किरीट सोमय्या बरसले
कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले…
शेतकरी आंदोलन : सुप्रिया सुळेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार; मोदी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Tags: dhanjay mundeudhav thackeray. उद्धव ठाकरेउमा खापरेधनंजय मुंडेराष्ट्रवादी
Previous Post

…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही; किरीट सोमय्या बरसले 

Next Post

धनंजय मुंडेंवर बला.त्काराचे आरोप करणारी रेणू शर्मा आहे तरी कोण? घ्या जाणून

Next Post
धनंजय मुंडेंवर बला.त्काराचे आरोप करणारी रेणू शर्मा आहे तरी कोण? घ्या जाणून

धनंजय मुंडेंवर बला.त्काराचे आरोप करणारी रेणू शर्मा आहे तरी कोण? घ्या जाणून

ताज्या बातम्या

गुजरात सरकारनं केलं ड्रॅगन फ्रूटचं बारसं; नाव वाचून बसेल धक्का

भाजपानं शहरांनंतर आता फळांकडे वळवला ‘नामांतर’ मोर्चा; ड्रॅगन फ्रूटचं केलं बारसं

January 20, 2021
भास्करराव पेरे पाटलांनी सांगितले मुलीच्या पराभवाचे खरे कारण; वाचून धक्का बसेल

भास्करराव पेरे पाटलांनी सांगितले मुलीच्या पराभवाचे खरे कारण; वाचून धक्का बसेल

January 20, 2021
धनंजय मुंडे प्रकरण! …तर कारवाईची जबाबदारी आमची; शरद पवारांनी केले मोठे विधान 

धनंजय मुंडे प्रकरण! …तर कारवाईची जबाबदारी आमची; शरद पवारांनी केले मोठे विधान 

January 20, 2021
कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात; ‘माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच’

‘जो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, त्यालाच निवडणुकीचं तिकीट देणार’

January 20, 2021
पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? वाचा ‘या’ सोप्या ट्रिक्स

पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? वाचा ‘या’ सोप्या ट्रिक्स

January 20, 2021
माझा कारभारी लय भारी! …म्हणून मी पतीला खांद्यावर उचलून घेऊन विजयोत्सव साजरा केला

‘या’ कारणामुळे विजयी नवऱ्याची बायकोने काढली खांद्यावरुन मिरवणूक; घ्या जाणून

January 20, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.