शिवसेनेने केले अजान स्पर्धेचे आयोजन; भाजपने उठवली टिकेची झोड

मुंबई | हिंदुत्वाच्या आणि मंदिरांच्या मुद्द्यावरून वारंवार शिवसेनेवर भाजपने निशाणा साधला होता. हिंदुत्ववाच्या मुद्द्यावरून माघार घेत शिवसेनेने धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा चढवला. कोरोनाकाळात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मंदिरे बंद ठेवली.

अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन साजरा करावा असा सल्ला शिवसेनेने दिला होता. यावरून भाजपने शिवसेनेला घेरले होते. यानंतर आता पुन्हा शिवसेनेच्या एका नेत्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा शिवसेनेवर भाजपने टीकेचे झोड उठवले आहेत कारण निवडणुकीसाठी शिवसेनेने आपले स्वरूप बदलल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले आहेत की, अजानमध्ये फार गोडवा असतो.

अजान एकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल असं मनाला वाटत राहते. अशा शब्दात त्यांनी अजानचं कौतुक केले आहे. एवढेच नाही तर शिवसेनेने शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यांनी यावेळी अजान स्पर्धेची माहिती दिली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज आणि उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशा प्रकारे म्हणतात याकडे मौलाना लक्ष देतील.

मौलाना परीक्षक म्हणून काम करतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षिस देण्यात येईल. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की अजान मुळे तुम्हाला त्रास होतो का? यावर ते म्हणाले की, अजान किती मिनिटाची असते? केवळ पाच मिनिटाची.

त्या पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. अजानची परंपरा खूप जुनी आहे. ती कालपरवा सुरू झालेली नाही. त्यामुळे त्याला विरोध करणे चुकीचे आहे. अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असंही पांडुरंग सकपाळ एका ऑनलाईन चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सिरमच्या लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होतोय, या दाव्यावर सिरमकडून मोठा खुलासा…

काय सांगता! आटपाडीच्या बाजारात आला दीड कोटींचा मोदी बकरा, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.