भाजप नगरसेवकाची महीला आरोग्य अधिकाऱ्याला रडेपर्यंत शिवीगाळ; म्हणाला, आयता पगार घेता

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.  पुण्यात कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी नातेवाईक धडपड करताना दिसून येत आहेत.

कोरोनाची लाट आल्यापासून आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, नर्स, आरोग्य अधिकारी रात्रं दिवस काम करत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आरोग्य अधिकारी आणि नातेवाईक, नेते यांच्यामध्ये वाद होण्याचे प्रकार घडत आहेत.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. अशातच भाजप नेते  वानवडीमधील नगरसेवक धनराज घोगरे  आणि आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.

वाद वाढत गेल्याने डॉ. जाधव यांना रडू कोसळले आहे. आरोग्य अधिकारी आपले काम करत असताना त्यांच्यासोबत वाद घालून दमदाटी  केल्याने आरोग्य कर्मचारी चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घोगरे म्हणाले, तुम्ही नीट काम करत नाही. दहा तास झाल फोन बंद आहे तुमचा. आयता पगार घेता तुम्ही असं धनराज घोगरे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना म्हटले आहे. यावर डॉ. जाधव यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

आम्ही गेल्या वर्षभरापासून काम करत आहोत. तुम्ही एका महिला अधिकाऱ्याशी बोलत आहात. तुम्ही कसं बोलता ते पाहा आधी. आम्ही तुमचे नोकर आहेत का? आम्ही काही घरची कामं करत नाही. असं म्हणतं डॉ. जाधव यांना राग अनावर झाला.

घोगरे यांनी प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी काही दिवसांपुर्वी आरोग्य विभागाला परवानगीसाठी प्रस्ताव दिला होता. प्रस्तावावर निर्णय होत नसल्याने आरोग्य अधिकारी जाधव आणि घोगरे यांच्यात राडा झाला.

दरम्यान राज्यात काल  ६३ हजार ३० ९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ९८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर एकूण मृत्यूंची संख्या ६७,२१४  झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख ७३ हजार ३९४ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
१८ वर्षांपेक्षा जास्त वय असले तरी ‘या’ लोकांनी कोरोना लस घेऊ नये; जाणून घ्या कारण…
सावधान! ही लक्षणे दिसताच घ्या काळजी, तुम्ही असू शकता कोरोना पॉझिटिव्ह; एम्सच्या तज्ज्ञांनी दिली माहिती
पठाण बंधूंची दर्यादिली! कोरोना रूग्णांना मोफत जेवन पुरवताहेत इरफान व युसुफ पठाण

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.