नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी त्या ठिकाणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrkant Patil) देखील हजर होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या चर्चेत नेमकं काय घडलं? संदर्भात माहिती दिली आहे. (bjp chandrkant patil talk about mahavikas aaghdi leader and devendra fadanvis meeting )
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “या भेटीत दोन्ही बाजूंकडून एकमेकांना ऑफर देण्यात आली. ही ऑफर जवळपास एकसारखीच होती. यामध्ये राज्यसभेचा उमेदवारी माघारी घ्या, त्याच्या बदल्यात विधानपरिषदेला जागा देण्यात येईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला. पण या प्रस्तावाला भाजपने नकार दिला आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करतो, असे सांगून ते बैठकीतून बाहेर पडले”, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “आम्ही दिल्लीला महाविकास आघाडीच्या प्रस्तावासंदर्भात माहिती दिली आहे. यावर दिल्लीकडून तुमची भूमिका योग्य असल्याचे उत्तर मिळाले आहे. शिवसेनेकडे इकडून तिकडून जोडून देखील तीस मते नाहीत. पण आमच्याकडे तीस मते आहेत. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा आमच्यासाठी महत्वाची आहे.”
“महाविकास आघाडीने राज्यसभेचा उमेदवार मागे घेतला नाही तर आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढविणार नाही, असे आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीस यांना फोन आला होता. राज्यसभेच्या उमेदवारीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यावरून चर्चा करायची आहे, अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
“यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही उमेदवारी माघारी घेणार नाही, तुम्ही जो प्रस्ताव घेऊन याल त्याचा आम्ही विचार करू, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले होते. महाविकास आघाडीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, आम्ही आमचा तिसरा उमेदवार मागे घेणार नाही”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “शिवसेनेकडे जादाची १३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे ८-९ मते आहेत. याउलट आमच्याकडे ३० मते आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी, हा मुद्दा चर्चेत मांडला. यावेळी चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली “, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“भारतीय क्रिकेटपटूंना देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट सिरीज खेळण्याची इच्छा आहे”
‘फॅन फॉलोईंग वाढावी म्हणून आकाश चोप्रा काहीपण बरळत असतो’; संतापलेल्या पोलार्डचा तडाखा
हिंदूंनी प्रत्येकवेळी गोळ्या खायच्या का? संरक्षण देता येत नसेल तर त्यांना बंदुका तरी द्या; मनसे आक्रमक