Share

भाजपची मोठी खेळी! शिवसेनेला झटका देण्यासाठी योगीजी मुंबईत येणार, आता लक्ष्य मुंबई महापालिका

yogi

उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. काही महिन्यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपने(BJP) आपले लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे वळवले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील भाजप नेते जोरदार तयारी करत आहे.(bjp big game for mumbai muncipal election)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत उत्तर भारतीयांचे मेळावे घेण्याचे नियोजन केले जात आहे. या मेळाव्यांना उत्तर प्रदेशातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. लवकरच आपण चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत सत्कार घडवून आणणार आहोत, अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी दिली आहे.

याबद्दल माहिती देताना कृपाशंकर सिंह यांनी सांगितले की, ‘भाजपच्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत बोलविले जाणार आहे. या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची कल्पना आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील मुंबईत बोलविण्यात येणार आहे”, असे कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.

“मुंबईत येऊन स्थायिक झालेले अनेक उत्तर भारतीय हे कष्टकरी आहेत. अनेकांचे पोट हातावर आहे. दिवसभर कष्ट केल्यानंतरच त्यांना अन्न मिळते. अशा लोकांशी उत्तर प्रदेशातीन मंत्री सवांद साधतील. त्यांचे प्रश्न समजून घेतील. त्यामुळे एक विश्वासाचे वातावरण तयार होईल. याकरिता आम्ही मेहनत घेत आहोत”, असे भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना कृपाशंकर सिंह म्हणाले की, “गोव्यात ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी विजय मिळवला आहे. त्याच पद्धतीने आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळेल. संपूर्ण उत्तर भारतीय मतदार देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा राहील. यासाठी मी स्वतः एक लाख लोकांच्या घरी भेटी देणार आहे”,असे कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.

यावेळी भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मुंबई काँग्रेसचे(Congress) अध्यक्ष भाई जगताप( Bhai Jagtap) यांच्यावर टीका केली. कृपाशंकर सिंह म्हणाले की, “भाई जगताप स्वबळाची भाषा करतात. पण कोणाच्या भरोशावर ते ही भाषा करतात? याचं उत्तर त्यांनाच माहित असावं. मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले, तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा भाजप होईल”, असे कृपाशंकर सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-
हवा उतरली! भुबन बड्याकरने ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले, ‘गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकेन’
IPL 2022: RCB ची मोठी घोषणा, विराटच्या जागी ‘या’ खेळाडूकडे दिली संघाची कमान, चाहत्यांना धक्का
VIDEO: अमिताभ यांना विचारला सेक्सी मुलींबद्दल ‘हा’ प्रश्न, अभिषेकने उत्तर देताच करणची बोलती झाली बंद

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now