बंगालमध्ये भाजप हारली, मात्र या महिला आमदाराची देशात होतेय चर्चा

पश्चिम बंगालचा विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये ममता बॅनर्जी यांनी बहुमत मिळवत सत्ता कायम ठेवली. तर संपूर्ण ताकद लावून देखील भाजपचा पराभव झाला. ममता बॅनर्जी यांचा मात्र पराभव झाला.

असे असले तरी भाजपच्या एका महिला आमदाराची चर्चा सध्या देशात सुरू आहे. या महिलेने गाडीशिवाय, पैशांशिवाय प्रचार केला. आणि चांगली बाब म्हणजे या निवडणूकीत ही महिला विजयी देखील झाली.

बंगालमधील सलोतरा येथील एका लहानशा झोपडीत राहणाऱ्या मनरेगा श्रमिक भाजप उमेदवार चंदना बाउरी यांच्या विजयाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. त्यांच्याजवळ तीन गाय, तीन बकरी, एक झोपडी अशी अवघी ३२ हजार रुपयांची संपत्ती आहे.

बांकुरा जिल्ह्यातील सालतोरा विधानसभा जागेवरुन चंदना बाउरी यांचा भाजपने उमेदवारी दिली होती. चंदना या अत्यंत गरीब कुटुंबातून आल्या आहे. चंदना बाउरी पश्चिम बंगालमधील सर्वात गरीब उमेदवारांमधील एक आहेत.

त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी चंदनाला मी जिंकू शकेल का, याबाबत भीती होती. मात्र अनेकजण तिच्या पाठीशी असल्यांच त्यांनी सांगितले होते. लोकांनी प्रचार करून त्यांना निवडणूक आणले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेसाठी आले होते, तेव्हा, चंदना बाउरी बंगालमधील महिलांच्या आकांक्षेचे चित्र आहे. असे म्हटले होते. त्या विजयी होतील असे कोणालाही वाटले नव्हते, आणि त्यांचा विजय झाला.

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू बनला आमदार; पहिल्यांदाच खेळणार राजकीय खेळपट्टीवर

तमिळनाडूमध्ये विजयी झालेल्या स्टॅलीन यांनी राज ठाकरेंना दिले ‘हे’ आश्वासन

…म्हणून मुलाच्या लग्नात दुखी होत्या शर्मिला टागोर; स्वत: सांगितले कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.