महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नवीन सरकारने आरेमध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान पर्यावरणप्रेमींनी सरकाराच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना(Shivsena) नेते आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.(bjp atul bhatkhalkar tweet about aadity thakare)
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला भेट देखील दिली आहे. या आंदोलनामध्ये लहान मुलांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजपने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिल्लकसेनेकडे कार्यकर्तेही उरले नाहीत बहुधा, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लिहिले आहे की, “आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करणे हे त्यांच्या असंवेदशीलता आणि वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक आहे. शिल्लक सेनेकडे कार्यकर्ते उरले नाहीत बहुधा. आदित्य ठाकरे यांचा तीव्र निषेध.”
यावर अद्याप आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आरेमध्येच मेट्रो कारशेड करण्याच्या नवीन सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. “आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका. या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा”, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती.
“महाविकास आघाडीचे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे होते. आम्ही कारशेड कांजूरला घेऊन जाणार होतो. नवीन सरकारचा निर्णय मुंबईसाठी योग्य नाही. आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही. या ठिकाणी अनेक प्राणी येतात”, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे या निर्णयाचा विरोध करताना म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?
अखेर उद्धव ठाकरे नरमले, उद्धव ठाकरे काँग्रेस-शिवसेनेला धक्का देत घेणार मोठा निर्णय