सध्या राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे उदयास येत आहे. असेच समीकरण आता भिंवडी तालुक्यात दिसून आले आहे. वळ, अलिमघर आणि निवळी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पण विशेष म्हणजे यासाठी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांमध्ये रस्सीखेच असली तरी काही ठिकाणी वेगळे चित्र पाहण्यास मिळते. भाजप आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते विरोधात असतानाही वळ आणि अलिमघर गावात या दोन्ही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वाया जाणारा पैसा, भांडणे, अंतर्गत वाद, विवाद विसरून शिवसेना आणि भाजपा पक्षाची युती करून दाखवली आहे. आणि इतर गावासमोर आर्दश ठेवला आहे.
आजपर्यंत वळ या गावात बिनविरोध निवडणूक झाली नाही. पण कोरोनाच्या काळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या गावातील नागरिकांना एकत्र पाहून सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील आणि माजी सरपंच रामदास भोईर यांचे कार्यकर्ते एकत्र आले. आणि हा इतिहास रचून दाखवला आहे.
भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.
उदयनराजे केंद्रीय मंत्री होणार? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
पाच बालकांना उचलून धगधगत्या आगीतून धावली होती शूर परिचारिका; काय घडलं होतं ‘त्या’ रात्री?
माणुसकीला काळीमा! ओळख न पटवताच अग्निकांडातील बालकांचे ‘ते’ मृतदेह पालकांच्या हवाली