‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, शिवसेनेचा टोला!

अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकार आणि कॉंग्रेसवर टिका करायला सुरुवात केली आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेवरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचे नेते तोडीसतोड उत्तर देत आहेत. आता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आपली प्रतिक्रिया मांडून ‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, असा टोला लगावला आहे.

“रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

“या प्रकरणी फिरोज शेख, नितेश सारणा यांना देखील अटक झाली आहे, पण यांच्याविषयी अजून कुणीही एक शब्द बोललेलं नाही. पण फक्त भाजपाने अर्णब गोस्वामी यांच्यासाठी एवढा आटापिटा का चालवला आहे”, असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.

“एका मराठी महिलेचे कुंकू पुसले गेले, त्याला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकले आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का? महाविकासआघाडीबाबत एवढी लोक बोलत आहेत, पण त्यांना आम्ही आत टाकत नाही. अर्णब यांच्या तोंडातून काही नावे बाहेर पडतील अशी भाजपला भिती आहे,” असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.

“कोर्टाच्या आदेशाने प्रकरणाचा नव्याने तपास सुरु असून राज्यात पोलिसांचे राज्य असून त्यांचेच राज्य राहील,” असेही यावेळी ते म्हणाले. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच “एका खुनी माणसाला वाचवायचे काम भाजपा करत आहे. गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचे. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नाव होते, नाईक‌ कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर‌ त्यांना तपासाची ‌परवानगी दिली,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मनुस्मृती प्रकरण: अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराकडून तक्रार दाखल 

…त्यामुळे शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानच्या घरातून फरफटत बाहेर काढले होते

‘त्या’ वक्तव्याबद्दल अलका कुबल यांनी मागितली माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.