राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या देशभरातील वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये(Hariyana) राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी जोरदार लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या राज्यांमध्ये अपक्ष आमदारांना देखील मतांसाठी चांगला भाव मिळत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने आपापल्या आमदारांना जयपूर आणि उदयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवले आहे. (BJP and Congress MLAs at the resort)
काँग्रेसने आपल्या आमदारांना उदयपूरच्या ताज अरावली या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. तर भाजपने जयपूरच्या देवीरत्न रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. यावेळी आमदारांना राजेशाही सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यांच्या विरंगुळ्यासाठी मॅजिक शो, गेम शो अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.
आमदारांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. आमदार रिसॉर्टमध्ये वाढदिवस साजरे करत आहेत. तसेच वेगवेगळे गेम्स देखील खेळत आहेत. विरंगुळ्यासाठी आमदार सिनेमे पाहत आहेत. सध्या रिसॉर्टमधील काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार आणि मंत्री मस्ती करताना दिसत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उदयपूरमधील ताज अरावली या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये मॅजिक शोचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. या मॅजिक शोचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये काही आमदार गाणे गाताना दिसत आहेत.
काँग्रेसने उदयपूरच्या ताज अरावली रिसॉर्टमध्ये आमदारांना राहण्यासाठी दीडशे रूम बुक केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक आमदाराला एक रूम देण्यात आली आहे. ताज अरावली रिसॉर्टमधील एका रूमचे भाडे सुमारे १५ ते ५० हजारांपर्यंत आहे. भाजपकडून जयपूरमधील देवी रतन रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी ६० रूम बुक करण्यात आल्या आहेत.
देवी रतन रिसॉर्टमधील एका रूमचे भाडे सुमारे ११ ते २१ हजारांपर्यंत आहे. राजस्थानशिवाय महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये थांबवले आहे. शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे. काल या हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :-
सिद्धू मुसेवालची हत्या करणाऱ्या संतोष जाधवचा पुण्यातला भयानक इतिहास वाचून हादरून जाल
खूपच रॉयल लाईफ जगते शिल्पा शेट्टी, दुबई, लंडनमध्ये आहे कोट्यवधींचे फ्लॅट; ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीण
‘त्या’ दिवशीच्या प्रदीप भिडेंच्या निवेदनाने अख्खा महाराष्ट्र रडला होता; काय होता तो प्रसंग? वाचा..