आंदोलन चिघळवणाऱ्या भाजपच्या दीप सिंधुला शेतकऱ्यांनी पळवून लावले; पहा व्हिडीओ

नवी दिल्ली | दोन महिन्यांपासून केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांनी मंगळवारी राजधानीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी आंदोलनात दीप सिंधु नावाचा तरुण दिसून आला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या तरुणाचा थेट भारतीय जनता पार्टी सोबत संबंध जोडण्यात आला आहे. लाल किल्ला परिसरात या दीप सिंधु यानेच आंदोलकांना घुसवले आणि झेंडा फडकवला असा आरोप त्याच्यावर आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले. आंदोलनात अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या. तसेच लाल किल्ल्यासमोरील खांबावर शेतकरी आंदोलकांनी झेंडा फडकवला आणि घोषणाबाजी केली. यामध्ये दीप सिंधु नावाचा तरुण सहभागी होता. शेतकरी नेत्यांनी त्याच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. या आंदोलनानंतर दीप सिंधुचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत दीप सिंधु हा रॅलीनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेला असता त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकरी आंदोलकांनी त्याला हकलून दिले आहे. शेतकरी त्याच्यावर आक्रमक झाल्याचे समजताच दीप सिंधु आणि त्याच्या सोबतच्या काही जणांनी तेथुन पलायन केले. यानंतर सिंधु हा बाईकवरून पसार झाल्याचे समजते.

 

रॅली दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. ठरलेल्या मार्गावरुन न जाता आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथील खांबावर झेंडा लावला. याप्रकारणी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आले आहे.

व्हिडीओतील तरुण दीप सिंधु याचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुरुदासपुरचे भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबत दिसत आहे. हा दीप सिंधु हा कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे ही माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच तो भाजप खासदार सनी देओल यांचा निकटवर्ती असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द
दिल्ली हिंसाचारावर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?”; भाजपचा सवाल
हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता;  गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.