बर्थडे स्पेशल! पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला जनतेस गाफील ठेवून निर्णय घ्यायला, जनतेस धक्का द्यायला आवडते. चला तर मग जाणुन घेऊयात नरेंद्र मोदींने घेतलेले महत्वपुर्ण निर्णय.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा सर्वात मोठा निर्णय घेतला. रात्री आठच्या सुमार टिव्हीवरून मोदींनी हा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांची भंबेरी उडाली होती.

नोटाबंदीनंतर काही दिवसांत मोदींनी ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. या निर्णयामुळे देशभरातील उद्योग आणि व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता.

भारतीय लष्कराच्या उरी येथील हवाई तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानमधील पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राइकच्या दरम्यान भारतीय जवान थेट पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये घुसले.

काही तासांमध्ये भारतीय जवानांनी पीओकेमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्याचा खात्मा भारतीय जवानांनी केला.

आर्थिक क्षेत्रातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे जीएसटी. ‘एक देश एक कर’ या धोरणाअंतर्गत ‘वस्तू व सेवा कर’ प्रणाली १ जुलै २०१७ रोजी लागू करण्यात आली. जीएसटीअंतर्गत अनेक कर वगळून केवळ एक कर देशभरात लागू करण्यात आला. या निर्णयामुळे काही वस्तू महागल्या, तर काही वस्तू स्वस्तही झाल्या.

२ अॉक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ हे सर्वात मोठे अभियान हाती घेतले. लोकसहभागातून गृहसंकुले, सरकारी कार्यालये, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरु करण्यात आले.

२८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या प्रधानमंत्री योजनेत पहिल्याच दिवशी दीड कोटी खाती उघडली गेली. त्याआधी देशभरामधील केवळ ४० टक्के लोक बँकिंग व्यवहार करीत होते. त्यात लगेचच बदल झाला. थोडय़ाच काळात ६० टक्क्यांहून अधिक भारत बँकिंग व्यवहाराच्या कक्षेत आला.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहिद झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केला. या हवाई हल्ल्यामध्ये बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले. जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या या हल्ल्यांमध्ये शेकडो दहशतवादी मारले गेल्याचा दावा सरकारने केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याची घोषणा केली. भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक लो अर्थ ऑर्बीट म्हणजे LEO उपग्रह पाडण्यात यश मिळवल्याची माहिती मोदींने दिली. असा पराक्रम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.

राज्यसभेत ३० जुलै २०१९ रोजी तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. ९९ विरूद्ध ८४ च्या फरकाने हे विधेयक मंजूर झाले. तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. दरम्यान, भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने सायरा बानू विरुद्ध भारत सरकार या याचिकेत बहुमताने निकाल देत तिहेरी तलाक हा राज्यघटनेशी पूर्णत: विपरीत, गैरसंवैधानिक ठरविला होता.

जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने ७ जुलै २०१९ रोजी उचलले. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी, करप्रणालीतील बदल, रस्ते वाहतुकीसाठी केलेले बदल, सर्जिकल स्ट्राईक, ऑनलाईन नेटबँकिंग सुविधा, विविध योजना थेट घरापर्यंत पोहोचवणे आणि त्याचे पैसे सबसिडी थेट जनतेच्या खात्यावर टाकणे, बुलेट ट्रेन, तिहेरी तलाक.

कलम 370 हटवण्याचा निर्णय, गंगा शुद्धीकरणाचा निर्णय, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक, भूसंपादन कायदा, रोजगार हमी योजनेच्या कायद्यात बदल करणं, अटल बिहारी पेन्शन योजना, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा लोन सारख्या महिलांसाठी सुविधा पंतप्रधान मोदींनी आणल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. हा निर्णय खूप महत्वपूर्ण होता. या निर्णयामुळे कोरोनाची दाहकता नेमकी किती आहे याची जाणीव काहीशा प्रमाणात नागरिकांना झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.