ड्रग्ससोबत सुरू होते बर्थडे सेलिब्रेशन, ‘या’ अभिनेत्रीला अटक

मुंबई पोलिसांनी तेलुगू अभिनेत्री नायरा शाह आणि तिचा मित्र साजिद हुसैन यांना ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नायरा आणि साजिद मुंबईतील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करत होते. वाढदिवस साजरा करताना त्यांनी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

रिपोर्ट्स नुसार नायरा मुंबईत जुहू येथे एका फाइव स्टार हॉटेलमध्ये मित्रांसोबत बर्थडे पार्टी करत होती. तिला पार्टीची अनुमतीदेखील मिळाली नव्हती, असे समोर आले आहे. पोलिसांना याची छुपी खबर मिळाली होती की पार्टीत ड्रग्स घेतले जात आहेत. व एका खोलीतून चरस वाली सिगरेट आणली गेली आहे.

अभिनेत्री देखील ती सिगरेट ओढत होती. रविवारी नायराचा वाढदिवस होता आणि दोन मित्रांसोबत ती हॉटेलच्या रुममध्ये पार्टी करत होती. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली आणि त्यांनी अटकेची कारवाई केली. घटनास्थळी पोलिसांना ड्रग्ज आढळले. पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अटकेनंतर नायराला सोमवारी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने तिची जामिनावर सुटका केली.  सोमवारी सकाळी नायराची मेडिकल टेस्ट करण्यात आली. रिपोर्टमध्ये जर नायराच्या शरीरात प्रमाणापेक्षा अधिक ड्रग्ज आढळल्यास, तिच्या अडचणीस वाढ होऊ शकते.

नायराला अटक केल्यानंतर वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने नायराची जामिनावर सुटका केली आहे. नायराने तेलुगू चित्रपट ‘मिरुगा’, ‘बुर्वा कथा’ आणि ‘इ-ई’ यामध्ये काम केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड आणि ड्रग्स यातील संबंध अनेकदा उघड झाले आहेत. बॉलिवूड कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन गेल्या काळापासून समोर येत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.