मुंबई | कोरोनाच्या महामारीतुन थोडाफार दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसत असतानाच देशावर नवीन संकट आले आहे. आता देशातील काही राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि केरळमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
बर्ड फ्लू H5N1 व्हायरस हा जंगली पक्ष्यांमध्ये आढळून येतो पण ते याने आजारी नसतात. मात्र ते जंगली पक्षी या व्हायरसने कोंबडी, बदक, कावळे, कबूतरे व मोर अशा सर्व पक्ष्यांना संक्रमित करतात. दरम्यान, या बर्ड फ्लू आजारापासुन तुम्ही स्वत:ला कशाप्रकारे वाचवू शकता हा प्रश्न प्रत्येक मांसाहारी व्यक्तीच्या मनात आहे.
या व्हायरसबाबत २००५ मध्ये WHO ने सल्ला दिला होता. जर तुम्ही चिकन, अंडी, मीट चांगलं आतून बाहेरून शिजवून खात असाल तर तुम्हाला बर्ड फ्लू H5N1 व्हायरसचा कोणताही धोका उद्भवणार नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरसने संक्रमित पक्ष्यांच्या घोळक्यातून फुड चेनमध्ये प्रवेश केला असेल तर लोकांना चिकन व अंडी खाल्ल्यानंतर बर्ड फ्लू धोका शकतो असे म्हटले आहे.
याचबरोबर ‘बर्ड फ्लू’पासून आपल्याला वाचायचे असेल तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. अर्धवट उकडलेली अंडी, अर्धवट शिजवलेलं चिकन, पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा, कच्चे मांस उघड्यावर ठेवणं टाळा आणि कच्च्या मांसाशी थेट संपर्क टाळा.
या आजाराची लक्षणं…
H5N1 या विषाणूची लागण झाल्यास आपण या रोगाला बळी पडू शकतो. याची लक्षणे कोरोना विषाणूसारखीच आहेत. यामध्ये ताप येणं, घशात खवखव, सर्दी, श्वास घेण्याचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याचा धोका असतो. कोरोना काळात हा फ्लू अधिक धोकादायक ठरु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
पोलीस चौकशीनंतर कंगनाने व्यक्त केला संताप, ‘तुम्ही राष्ट्रवादी असाल तर…’
धक्कादायक! कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू…
भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका; ‘अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की…’