मुंबई | कोरोनाच्या महामारीतुन थोडाफार दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसत असतानाच देशावर नवीन संकट आले आहे. आता देशातील काही राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि केरळमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे बर्ड फ्लूच्या भीतीमुळे किरकोळ ग्राहकांकडून चिकन आणि अंडय़ांच्या मागणीत घट झाली आहे. केरळमधील बर्ड फ्लूच्या धास्तीमुळे चिकन, अंडय़ांच्या दरात गेल्या आठवडय़ापासून घट सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यावसयिकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अमरावतीच्या बडनेऱ्यात २८ कोंबड्या दगावल्या आहेत. वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण २८ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांचे म्हणणे, अचानक जमिनीवर कोसळून त्या कोंबड्या गतप्राण झाल्या, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निमकर यांनी बडनेऱ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला याची माहिती दिली.
दरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मात्र या घटनेमुळे आता आता राज्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध…
या व्हायरसबाबत २००५ मध्ये WHO ने सल्ला दिला होता. जर तुम्ही चिकन, अंडी, मीट चांगलं आतून बाहेरून शिजवून खात असाल तर तुम्हाला बर्ड फ्लू H5N1 व्हायरसचा कोणताही धोका उद्भवणार नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरसने संक्रमित पक्ष्यांच्या घोळक्यातून फुड चेनमध्ये प्रवेश केला असेल तर लोकांना चिकन व अंडी खाल्ल्यानंतर बर्ड फ्लू धोका शकतो असे म्हटले आहे.
याचबरोबर ‘बर्ड फ्लू’पासून आपल्याला वाचायचे असेल तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. अर्धवट उकडलेली अंडी, अर्धवट शिजवलेलं चिकन, पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा, कच्चे मांस उघड्यावर ठेवणं टाळा आणि कच्च्या मांसाशी थेट संपर्क टाळा.
महत्त्वाच्या बातम्या
नामांतरावरुन आघाडीत बिघाडी! ‘नामांतराची भूमिका शिवसेनेची; सरकारची नाही’
‘ज्या गालावर पोलिसांनी मारलं, त्याच गालावर राज ठाकरेंनी फिरवला प्रेमाचा हात’
उदयनराजे केंद्रीय मंत्री होणार? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण