Bipasha Basu : बिपाशा बसूने चाहत्यांना दाखवली मुलीची पहिली झलक; लेकीच्या नावात आहे हिंदू धर्माचा खास अर्थ

Bipasha Basu : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री बिपाशा बसूने शनिवारी (१२ नोव्हेंबर) मुलगी झाल्याच्या गुड न्यूजला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये मुलीची पहिली झलक शेअर करून तिचे नाव देखील उघड केले आहे.

अभिनेत्रीने शनिवारी (12 नोव्हेंबर) एका मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या घरात लग्नाच्या 6 वर्षांनंतर मुल जन्माला आले. 2016 मध्ये दोघांचे लग्न झाले. यावर्षी बॉलीवूडची सुपरहिट अभिनेत्री आलिया भट्टनंतर आता बॉलिवूडची आणखी एक सुंदर अभिनेत्री बिपाशा बसू आई बनली आहे.

बिपाशा बसूने तिच्या गुड न्यूज पोस्टमध्ये मुलीच्या पायाचा सुंदर फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘12.11.22, देवी बासू सिंग ग्रोव्हर, आमच्या प्रेमाचे फळ आणि आईचे आशीर्वाद आले आहेत आणि ती दिव्य आहे’, बिपाशा-करण. बिपाशा-करणने त्यांच्या छोट्या देवदूताचे नाव देवी बासू सिंग ग्रोव्हर ठेवले आहे. या पोस्टमध्ये मुलीचे एक सुंदर चित्र देखील आहे.

बिपाशाच्या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदन केले, तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा ओघ सुरू झाला. मुलगी झाल्याबद्दल चाहते तिचे खूप खूप अभिनंदन करत आहेत. या आनंदासाठी चाहत्यांसह सेलेब्स देखील या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. यामध्ये अभिनेत्री सोफी चौधरीने या जोडप्याचे अभिनंदन केले आणि लिहिले की, “सर्वात चांगली बातमी, देव तुमच्या छोट्या देवदूताला आशीर्वाद देईल”.

या गुड न्यूजमुळे संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण आहे. करण आणि बिपाशाने यावर्षी प्रेग्नेंसीची गुड न्यूज दिली होती आणि तेव्हापासून चाहते तीच्या पहिल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होते. बिपाशाने तिच्या गर्भधारणेदरम्यान स्वतःची चांगली काळजी घेतली होती आणि वेळोवेळी व्हिडीओ आणि काहीवेळा फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करून तिची स्थिती शेअर केली होती.

त्याचबरोबर बिपाशा बसूही अनेक व्हिडिओंमध्ये मस्ती करताना दिसली. करण आणि बिपाशाने एकत्र अनेक मॅटर्निटी फोटोशूट देखील केले होते, ज्यामुळे बिपाशाला ट्रोल देखील व्हावे लागले होते. 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर भेट झाली आणि पुढच्या वर्षी 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. त्याच वेळी, लग्नाच्या 6 वर्षानंतर, या जोडप्याला मुलगी म्हणून पहिले अपत्य प्राप्त झाले.

अलीकडेच बिपाशाने एक सुंदर मॅटर्निटी फोटोशूट शेअर केला होता, ज्यावर यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्याचवेळी आलिया भट्टनेही बिपाशाला काही मॅटर्निटी कॉस्च्युम्स पाठवले.आलियाने एका मुलीलाही जन्म दिला.

6 नोव्हेंबरला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील एका मुलीचे पालक झाले आहेत. अलीकडेच रणबीर आपली मुलगी आणि पत्नी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी घेऊन गेला. मुलीच्या आगमनाने कपूर कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या
Mansi Naik : लग्नाच्या दिड वर्षातच मराठमोळी ‘ही’ अभिनेत्री घेणार घटस्फोट? नवऱ्याचं आडनावही हटवलं
PAK vs ENG T20 World Cup 2022 Final : पाकड्यांचा माज उतरला! इंग्लंडने पाकचा धुव्वा उडवत जिंकला वर्ल्डकप; ‘हा’ खेळाडू ठरला विजयाचा हिरो
प्रियकराने फेसबुक लाईव्हवर ग्राइंडर मशीनने कापला स्वत:चा गळा; प्रेयसीमुळे उचललं भयानक पाऊल