बॉलीवूडची सर्वात हॉट आणि ग्लमर्स अभिनेत्री म्हणून बिपाशा बासूकडे पाहीले जाते. तिने तिच्या सुंदरतेने अनेकांना घायाळ केले आहे. आज ती चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्या फॅन्सपासून लांब नाही. ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
बिपाशाने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंग करताना देखील तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिला यश मिळाले. अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर ती सुपर मॉडेल झाली होती. सुपर मॉडेल म्हणून तिने अनेक वर्ष मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये राज्य केले.
मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ती मुंबईच्या एका चाळीत राहत होती. कारण दुसरीकडे राहण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. पण आज मात्र बिपाशाकडे प्रसिद्धी आणि पैसे दोन्ही गोष्टी आहेत. तिने स्वत: च्या मेहनतीने या गोष्टी मिळवल्या आहेत.
बिपाशाने ‘अजनबी’ चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट हिट झाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहीले नाही. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ती करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे. जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्तीचा आकडा.
ब्लॅक ब्यूटी बिपाशा बासू ५०० करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे. अनेक चित्रपट आणि जाहीरातींमध्ये काम करुन तिने ही संपत्ती मिळवली आहे. तिचे स्वप्न होते की, तिला मुंबईत छोटे घर घ्यायचे आहे. पण आत्ता तिचा मोठा बंगला आहे. तिने स्वत: मेहनत करुन हा बंगला खरेदी केला आहे.
बिपाशाच्या घराची किंमत १०५ करोड आहे. तिने या घराच्या सजावटीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. या घराची सजावट करण्यासाठी तिने बाहेर देशातून डिझायनर आणले होते. तीन वर्ष या घराच्या सजावटीवर ती काम करत होती.
घरासोबतच बिपाशा महागड्या गाड्यांची माकलिण आहे. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यासोबतच तिचे मुंबई आणि कोलकात्तामध्ये दोन फ्लॅट देखील आहेत. बिपाशाला दागिन्यांची खुप आवड आहे. त्यामूळे तिच्याकडे अनेक महाग दागिने आहेत.
बिपाशा तिचा पती करण सिंग ग्रोव्हरसोबत मुंबईत राहते. करण हा देखील अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि टेलिव्हिजनवर काम केले आहे. अभिनयासोबत बिपाशा स्वत: चा व्यवसाय देखील करते. ती एका वेबसाईटची मालकिण आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात
या’ व्यक्तिला डेट करत आहे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया; पहा फोटो
जाणून घ्या मन उधाणं वाऱ्याचे आणि तुजविण सख्या रे मालिकेतील अभिनेत्री आज काय करत आहेत
बाबो! ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे तैमूर खानशी लग्न; म्हणाली ‘वाट पाहायला तयार आहे’