डायबिटीजवर प्रभावी असलेल्या बायोकॉनच्या औषधाला मंजूरी; कमी खर्चात करता येईल शुगर कमी

डायबिटीज म्हणजेच मधूमेह असलेल्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. शुगर लेव्हल जास्त होऊ नये, यासाठी काळजी घेतात. तसेच शुगर लेव्हल कमी करणयासाठी इन्सुलिनवर अवलंबुन राहावे लागते.

अशात डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.अमेरिकेच्या फुड आणि ड्रग ऍडिमिनिस्ट्रेशनने बायोकॉन-वायट्रिसचे सेमग्ली या औषधाला मंजूरी दिली आहे. हे असे पहिले इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रॉडक्ट आहे, ज्याचा उपयोग डायबिटीजच्या उपचारात इन्सुलिनवरप्रमाणे केला जातो.

अमेरिकेच्या फुड आणि ड्रग ऍडिमिनिस्ट्रेशनने सेमग्लीला मंजूरी दिल्यामुळे सनोफिचे औषध लँटसच्या ऐवजी वापरले जाऊ शकणार आहे. तसेच रुग्ण आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय हे औषध मेडिकल स्टोअरमधून खरेदी करु शकतात.

हे बायोसिमिलर औषध बायोकॉन बनवणार तर अमेरिकेत सेमग्लीचे मार्केटींग बायोकॉनची पार्टनर कंपनी वायट्रिस करणार आहे. हा त्या लोकांसाठी महत्वाचा दिवस आहे, जे लोकं शुगर कमी करण्यासाठी इन्सुलिनवर अवलंबून होते, असे अमेरिकेच्या फुड आणि ड्रग ऍडिमिनिस्ट्रेशनचे कार्यकारी आयुक्त जेनेक वुडवॉक यांनी म्हटले आहे.

सेमग्ली हे प्रॉडक्ट यासाठी महत्वाचे आहे, कारण हे इंटरचेंजेबल प्रॉडक्ट डायबिटीजच्या रुग्णांना परवडणारे आहे. हे कमी खर्चा बनवलेले सुरक्षित औषध आहे. जे रुग्णांच्या मदतीसाठी प्रभावी ठरणार आहे, असेही वुडवॉक यांनी म्हटले आहे.

जगभरात टाईप १ आणि टाईप २ चे कोट्यवधी रुग्ण आहे. कोरोनामुळे मागील दिड वर्षात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी हे नवीन औषध डायबिटीजच्या रुग्णांसाठी दिलासादायक असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

एकतर्फी प्रेमाने केलं विवाहित तरुणीचं आयुष्य उध्वस्त; तरुणीची 7 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या
ICICI बँकेच्या माजी मॅनेजरनेच बँकेवर टाकला दरोडा; असा आखला होता प्लॅन
VIDEO: अरेरे! बिचारा फोटोग्राफर नवऱ्याला पोज दाखवायला गेला अन् स्वतःचं तोंडावर पडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.