अबब! बिल गेट्स घटस्फोटानंतर मेलिंडा गेट्स यांना पोटगीपोटी देणार तब्बल १५ हजार कोटींची संपत्ती

सिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतला आहे. याबाबत त्या दोघांनी पण स्वतंत्र पत्रक काढून त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी जवळपास २७ वर्ष एकत्र संसार केला. बिल गेट्स यांनी त्यांच्या मालकीची कॅस्केड इनव्हेस्टमेंटस कंपनी आणि मेक्सिकोमधील दोन कंपन्या मेलिंडा गेटस यांच्या नावावर करून 15 हजार कोटींचीही संपत्ती दिली आहे.

कॅस्केड इनव्हेस्टमेंटस,एफईएमएसओ आणि ग्रुप टेलेस्वियाची मालकी मेलिंडा गेट्स यांच्याकडे राहणार आहे. ब्लूमबर्गनं यासंबंधातील रिपोर्ट दिला आहे. कॅस्केडनं कॅनडियन नॅशनल रेल्वे सोबतच ऑटो नेशन आयएनसी या दोन कंपन्यांची मालकी पण मेलिंडा गेट्स यांच्याकडे गेली आहे.

बिल गेटस यांनी कॅस्केड इनव्हेस्टमेंटसी निर्मिती केली होती. कॅस्केड कंपनीकडे रिअल इस्टेट, ऊर्जा, हॉटेल व्यवसाय आणि १३ इतर कंपन्यांची मालकी आहे. मार्कर डेरे क्षेत्रातील कंपनीत पण १० टक्के शेअर्स आहेत. बिल गेट्स अमेरिकेतील सर्वात मोठे जमीनदार आहेत.

वॉशिग्टनच्या मेदिनामध्ये त्यांचं 66 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर अलिशान निवासस्थान आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी संयुक्त पत्रक जारी केले आहे, त्यात त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे.

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी म्हटले आहे की, ““आम्ही खूप विचाराअंती आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांच्या प्रवासात आम्ही 3 मुलांना वाढवलं आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली. आमचा त्या विचारांवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ.”

“भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावं हीच विनंती,”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.