बाजारात आलाय फक्त छोट्याश्या डब्बीमध्ये मावनारा भलामोठा गाडीचा कव्हर; जाणून घ्या..

भारतात दुचाकी स्वारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र जिथे बाईक येते तिथे तिची देखभाल करणे ही तितकेच गरजेचे असते. सूर्यप्रकाश आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी बाईक झाकून ठेवणे महत्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या बाईकला कव्हर घालतो, मात्र हे कव्हर मोठे असून सांभाळून ठेवण्यास बऱ्याचदा त्रास होतो. आज एक अश्या बाईक ब्लेझरबद्दल जाणून घेऊ ज्यामुळे बाईक कव्हरची संज्ञा बदलली.

बाईक ब्लेझर’चे संस्थापक 27 वर्षीय केशव राय आहेत, ज्यांनी त्यांचे पालक, रेणू राय आणि राकेश कुमार यांच्यासह 2016 मध्ये कंपनीची स्थापना केली. केशव यांना नवनविन प्रयोग करायची आवड होती. एकदा दिल्लीच्या मोनोरेल स्टेशन बाहेर बसलेले असताना एक व्यक्ती बाईकची धूळ झाडताना दिसला त्यातून त्यांना बाईक ब्लेझरची कल्पना आली.

घरच्यांचा पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ असल्याने केशव यांनी बाईक ब्लेझरची डिझायनिंग चालू केली.
2018 मध्ये त्यांनी सेमीऑटोमॅटिक बाईक कव्हर लाँच केले. आज हे कव्हर केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी ग्राहकांमध्येही आपले स्थान निर्माण करत आहे.

कव्हर चांगल्या प्रतीच्या फॅब्रिकपासून बनवले गेले आहे, जे सर्व हवामान परिस्थितीत बाईकचे संरक्षण करते. आपल्या या बाईक ब्लेझर बद्दल सांगताना केशव म्हणतात की, आमच्या बाईक कव्हरचे दोन भाग आहेत – एक डिव्हाइस आणि एक कव्हर. डिव्हाइस एक अर्ध -स्वयंचलित डिव्हाइस आहे ज्यामध्ये आच्छादन आहे. हे हँडलच्या मदतीने बाहेर काढले जाते आणि बाईकवर बसवले जाते आणि नंतर हँडलच्या मदतीने ते पुन्हा डिव्हाइसमध्ये येते. बाईकच्या साईड गार्डवर हे उपकरण सहज बसवता येते.

आज या बाईक ब्लेझरची मागणी भारताबाहेर सुद्धा असून केशव यांच्या या व्यवसायाची उलाढाल की तब्बल १ कोटी इतकी आहे. बाइकच्या ब्लेझरची किंमत 700 ते 900 रुपयांपर्यंत आहे.

केशव त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या आई -वडिलांना देतो, ज्यांचा नेहमी त्याच्यावर विश्वास होता. त्याने त्याच्या अद्वितीय उत्पादनाचे पेटंटही घेतले आहे. केशव सांगतात की पुढे देखील वाहनांसाठी अशा कव्हर्सची रचना करण्याची त्यांची योजना आहे.

 

महत्वाच्या बातम्या
सौंदर्याला वयात तोलता येत नाही हे खरे! सलमानच्या हिरोईनने ५२ व्या वर्षी केला बिकीनी शूट
मीना कुमारीला दारू आणि तंबाखूचे होते जबर व्यसन, या व्यसनामुळेच गेला गेला होता तिचा जीव
उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार, राज्यात शाळा महाविद्यालये बंद; योगी सरकारचे आदेश
भावना दुखावल्यामुळे अभिनेता महेश कोठारेंनी मागितली माफी, नक्की काय आहे प्रकरण, वाचा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.